Join us  

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:47 PM

आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकले आहेत. तसेच 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) मालिकेतील अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. हा अभिनेता कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर हा अभिनेता म्हणजे 'लकी' फेम अभय महाजन (Abhay Mahajan).

अभिनेता अभय महाजन लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. मागील वर्षाच्या अखेरीस अभय महाजनने त्यांची खास मैत्रीण दिया नायडू सोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी साखरपुड्याचे खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. दिया नायडू ही कोरिओग्राफर आहे. हे दोघे आता लवकरच लग्न करणार आहेत. नुकतेच अभिनेत्री पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे यांनी अभयचे केळवण साजरे केले. तर इकडे देखील दिया नायडू हिचे केळवण झाल्याचे पाहायला मिळाले. याच महिन्यात त्या दोघांचे लग्न होणार असल्याचे बोलले जात आहे. 

अभय महाजनला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. बीएमसीसी कॉलेजमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातील नाटक कंपनी संस्थेशी तो जोडला गेला. अभिनयासोबतच अभयने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे. भडीपाच्या अनेक सीरिजमध्ये त्याने काम केले आहे. संजय जाधव यांच्या लकी चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत झळकला आहे. कहाणी मित्र की, खामोश अदालत जारी है या नाटकातून तो महत्वाची भूमिका साकारताना दिसला. शांतीत क्रांती वेबसिरीज, अवांछित, अश्लील उद्योग मित्र मंडळ अशा चित्रपटात तो झळकला आहे.

टॅग्स :शिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीअक्षया देवधरहार्दिक जोशी