Join us  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आहे या गोष्टीची आवड?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 8:57 AM

आपला अभिनय,सौंदर्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ...

आपला अभिनय,सौंदर्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.सिनेमात अभिनयाने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी ही रिअल लाईफमध्ये उत्तम सायकलिस्ट आणि रनर  असून लवकरच ती ट्रायक्लोशॉनमध्ये सहभागी होणार आहे. सायकलिंग आणि रनिंगची आपली ही आवड जोपासण्यासाठी सोनाली तितकीच मेहनतसुद्धा घेते. खार ते वर्सोवा किंवा वांद्रेपर्यंत ती सायकलिंग करते.आपल्या सायकलिंगबद्दल असणारी आवड सोनाली वेळोवेळी सोशल मीडियावरुन तिच्या फॅन्ससह फोटोंच्या माध्यमातून शेअर करत असते. सर्वजण रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असताना आपण त्याच दिवशी पहाटे साडेचार वाजता उठून दोन-तीन किमी रनिंग करत असल्याचे सोनालीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.रनिंगसोबत 20-25 किमी सायकलिंगही करत असल्याचेही सोनालीने सांगितले आहे.ट्रायक्लोथॉन या स्पर्धेत स्पर्धकांचा कस लागतो. ही स्पर्धा साधी सोपी नसून अनेक आव्हानांचा सामना स्पर्धकाला करावा लागतो. ज्यात पोहणे, सायकलिंग आणि रनिंग अशा तिन्ही प्रकारात स्पर्धकाला स्वतःला सिद्ध करावे लागते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ट्रायक्लोथॉन स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेत असल्याचे सोनाली सांगते. नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा पोस्टर बॉईजमध्ये सोनाली कुलकर्णी सनी देओलच्या पत्नीची भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सोनाली आणि सनी यांची चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघांची पोस्टर बॉईजच्या आधीपासूनच खूप चांगली बाँडिंग आहे. कारण मॅन या चित्रपटात सोनाली आणि सनी एकत्र काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी चित्रीकरण देखील केले होते. पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे पोस्टर बॉईज या चित्रपटाचा विषय आला, त्यावेळी सनीनेच श्रेयस तळपदेला सोनालीचे नाव सुचवले होते. सिनेमात सोनालीची सनीसोबत असलेली केमिस्ट्री रसिकांना भावली.  दरम्यानच्या काळात रम्यानच्या काळात देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा २,कच्च लिंबू  यांसारख्या मराठी सिनेमांमध्येही झळकली होती.