Join us  

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:08 PM

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. मृण्मयीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरूनच केली होती. झी मराठीवरील ‘कुंकू’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर ती ‘अग्निहोत्र’ या मालिकेतही झळकली होती. मालिकेनंतर ती रुपेरी पडद्याकडे वळली. आता ती लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मृण्मयी देशपांडे सन मराठी वाहिनीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेत ती खास हजेरी लावणार आहे. मालिकेतील लग्न सोहळ्यात मृण्मयी संगीत सोहळ्यात उपस्थित राहणार असून  यावेळी तिचा धमाल डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. शाब्बास सुनबाई’ ही मालिका वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. विचारांच्या विरुद्ध दिशेने संजीवनी आपली वाटचाल कशा पद्धतीने करते याचे चित्रण या मालिकेत दाखवण्यात आले आहे.

मृण्मयी देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात तिने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे