Join us  

अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 8:00 AM

चिन्मय उदगीरकर आगामी सिनेमात रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे 'प्रेमवारी' चित्रपट ८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला

 'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वांसाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारीत 'प्रेमवारी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. हे पोस्टर पाहून हा नक्कीच एक रोमँटिक सिनेमा वाटतो आहे. या चित्रपटात चिन्मय उदगीरकर व मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डेचा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या चित्रपटातून मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा येत आहे. साईममित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित प्रेमवारी या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले. या सुंदर चित्रपटाचे  लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. चिन्मय सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील घाडगे अॅण्ड सून मालिकेत अक्षयच्या भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. या मालिकेत “घाडगे & सून” होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे “घाडगे & सून” ज्यामध्ये नाते सून आणि आज्ये सासूचे एक वेगळ नाते प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.प्रेमवारी चित्रपटात चिन्मय उदगीरकरचा रोमँटिक अंदाज पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकरघाडगे अँड सून