Join us  

69th National Film Awards एकदा काय झालं'ने उमटवली राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर, ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 6:09 PM

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'एकदा काय झालं' या मराठी सिनेमाने बाजी मारली आहे.

68th National Film Awards:  ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'एकदा काय झालं ' (Ekda Kaay Zala ) या चित्रपटानेही बाजी मारली आहे.  गेली काही वर्ष सतत मराठी सिनेमांना सर्वोत्कृष्ट सिनेमांचे राष्ट्रीय पुरस्कार, अभिनेत्यांना, दिग्दर्शकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत.

 डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित अभिनेता सुमीत राघवन आणि  उर्मिला कोठारे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एकदा काय झालं सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार आपली मोहर उमटवली आहे. 

 डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात  एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत विचार पोहोचवण्याची कला अवगत असलेला बाबा आणि त्याच्या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या शाळेची, त्याच्या प्रामाणिकपणाची आणि त्याच्या दृढ निश्चयांची गोष्ट या चित्रपटात यात आहे. याला संगीतही सलील यांनीच दिलं. यात गोष्टी आणि नाटकांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याला प्राधान्य देणारा शिक्षक किरण आणि त्याचा मुलगा चिंतन यांची भावस्पर्शी कथा यात आहे.

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018एकदा काय झालंसुमीत राघवन