Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला पाहण्यासाठी दीड लाख लोक जमले", रामानंद सागर म्हणाले...; स्वप्नील जोशीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:46 IST

डॉ. रामानंद सागर यांनी स्वप्नील जोशीला दिलेला 'हा' मोलाचा सल्ला, अभिनेत्याने सांगितली खास आठवण 

Swapnil Joshi: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). उत्तम अभिनय आणि पर्सनॅलिटीच्या जोरावर स्वप्नील जोशीने सिनेसृष्टीत स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून त्याला ओळखलं जात. अभिनेत्याने त्याच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत बऱ्याच चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु स्वप्नील जोशीने १९९३ साली डॉ. रामानंद सागर यांच्या  'श्री कृष्ण' मालिकेत साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका चांगलीच गाजली होती. आजही त्याची ती भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत बालकलाकार म्हणून त्याचं कौतुकही झालं होतं. दरम्यान, अभिनेत्याने एका मुलाखतीत 'श्रीकृष्ण' या मालिकेत काम करताना डॉ. रामानंद सागर यांनी अभिनेत्याला काय सल्ला दिला होता, याची खास आठवण सांगितली आहे.

स्वप्नील जोशीने 'तिखट मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत एक किस्सा शेअर केला होता. या मुलाखतीमध्ये अभिनेता 'श्री कृष्ण' मालिकेदरम्यानच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी स्वप्नील म्हणतो की, "एक आवर्जून एक किस्सा सांगू इच्छितो की मी हरिद्वारच्या जवळ एका कृष्णाच्या देवळाचं उद्घाटन करण्यासाठी कृष्ण म्हणून  गेलो होतो. त्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि मग दिल्लीवरुन मी  आणि डॉ. रामानंद सागर चार्टेड हेलिकॉप्टरने  तिकडे जाणार होतो, उद्घाटन करणार होतो आणि परत दिल्लीला येणार होतो. त्यानंतर मग आम्ही मुंबईला येणार होतो. त्यावेळी पहिल्यांदा मी चार्टड हेलिकॉप्टरमध्ये बसलो. आम्ही तिकडे गेले सव्वा दोन तास आम्ही  त्या वेन्यूच्यावर लॅंड करायचा प्रयत्न करत होतो पण जिथे हेलिपॅडसाठी जागा बनली होती तिथे माणसं होती. तिथे साधारण दीड-एक लाख माणसं होती आणि सव्वा दोन तासानंतर आम्हाला लॅंडिंग करू दिलं. साधारण जिथे हेलिकॉप्टर उतरलं होतं तिथून देवळापर्यंत साधारण पाच मिनटात पोहचू इतकं अंतर होतं. त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी साडे सहा सात लागले होते."

डॉ. रामानंद सागर यांनी दिला होता मोलाचा सल्ला

"शेवटी तिकडून मला परत येण्यासाठी स्कोपच नव्हता. सी.आर.पी.एफ मागवलं होतं बटालियन अ‍ॅडिशनल्स मागवल्या होत्या. अखेर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, आम्ही हा क्राउड कंट्रोल करु शकत नाही. कारण लोक त्याला परत जाऊ देणार नाहीत. त्यानंतर मग मला तिथूनच हवेत उचलण्यात आले तेव्हा हेलिकॉफ्टर मंदिराच्या वरती होतं. अशा पद्धतीने मला दिल्लीला परत आणलं होतं. त्यावेळी मी सोळा वर्षांचा होतो." मला रामानंद सागर यांचे ते शब्द फार छान आठवतात, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, "बेटा, ज्यावेळी पालक आपल्या मुलांवर संस्कार करतात, त्यावेळी तू संपूर्ण देशावर संस्कार करतो आहेस...!"

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेतासेलिब्रिटी