Join us  

वडिलांजवळ बसलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? चेहऱ्यावरचा कडक लुक तर पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 10:38 AM

लहानपणापासूनच अंगात अभिनयाचा किडा होता हे तिच्या लुकमधून दिसतंय.

सेलिब्रिटींच्या लहानपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कित्येक फोटोत तर त्यांना ओळखणंही कठीण होतं. बदललेला लुक, स्टाईल यामुळे हे सेलिब्रिटी लहानपणी असे दिसायचे यावर विश्वासही बसत नाही. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केलाय. बघा ओळखू येतेय का ही अभिनेत्री..

मराठी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचा फोटो नुकताच शेअर केला. यामध्ये ती वडिलांजवळ बसलेली दिसत आहे तर तिची धाकटी बहीण आईच्या मांडीवर बसली आहे. वडिलांजवळ बसलेली ही अभिनेत्री फोटोत अगदी अॅटिट्यूडमध्ये लुक देताना दिसत आहे. म्हणजे लहानपणापासूनच अंगात अभिनयाचा किडा होता हे तिच्या लुकमधून दिसतंय. ओळखलंत का या अभिनेत्रीला?

तर ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी स्पृहा जोशी (Spruha Joshi). 'safety net' अशा कॅप्शनसह तिने कुटुंबासोबतचा हा जुना फोटो पोस्ट केलाय. स्पृहा दादरला मध्यमवर्गीय कुटुंबात मोठी झाली. लहानपणापासूनच तिला कविता, गाणी, आणि अभिनयाची आवड होती. स्पृहा सुरुवातीला स्पर्धा परिक्षांची तयारी करत होती. मात्र एकदा अभिनयाची संधी मिळाल्यानंतर तिला तेच मनात बसलं आणि ती मनोरंजनक्षेत्रात उतरली. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेतील 'कुहू' ही भूमिका असो किंवा 'उंच माझा झोका' मधील रमाबाई रानडे असो स्पृहाच्या प्रत्येक भूमिका गाजल्या. आज ती मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

टॅग्स :स्पृहा जोशीमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्