Join us  

"...त्यामुळे मी प्रेग्नंट आहे असं लोकांना वाटलं, पण आम्हाला मुलं नको आहेत", प्रार्थना बेहेरेने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 4:48 PM

मध्यंतरी प्रार्थना कलाविश्वापासून दूर होती. ती गरोदर असल्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात होतं. याबाबत आता खुद्द प्रार्थनानेच खुलासा केला आहे. 

'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. अल्पावधीतच तिने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'कॉफी आणि बरंच काही',' मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'मितवा' अशा अनेक मराठी चित्रपटांत प्रार्थना झळकली. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील प्रार्थनाची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. प्रार्थनाने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नुकतंच प्रार्थनाने तिच्या युट्यूब च‌ॅनेलवर 'मी आणि माझं जग' नावाची सीरिज सुरू केली आहे. यामध्ये प्रार्थना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिसते. या सीरिजचा नव्या एपिसोड नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये प्रार्थनाने तिच्याबद्दलच्या एका अफवेबद्दल खुलासा केला आहे. मध्यंतरी प्रार्थना कलाविश्वापासून दूर होती. ती गरोदर असल्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात होतं. याबाबत आता खुद्द प्रार्थनानेच खुलासा केला आहे. 

"मध्यंतरी मी गरोदर असल्यामुळे काम बंद केलं असं लोकांना वाटत होतं. त्याच दिवसांत मी पोलका डॉटवाला ड्रेस घालून फोटोही पोस्ट केला होता. जेव्हा हिरोईन पोलका डॉचा ड्रेस घालते तेव्हा ती गरोदर असते, असं लोकांना वाटतं. त्यामुळे तेव्हाही मी प्रेग्नंट असल्याचं लोकांना वाटलं होतं," असं प्रार्थना म्हणाली. 

प्रार्थनाने या मुलाखतीत पाळीव प्राण्यांचाच ते मुलं मानत असल्याचाही खुलासा केला. ती म्हणाली, "आम्हाला मुलं नको आहेत. कारण, आमच्या घरातील पाळीव कुत्रेच आमची मुलं आहेत. माझे आणि अभीचे विचारही याबाबत सेम आहेत. मला मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी शेल्टर रुम उघडायचं आहे."  

टॅग्स :प्रार्थना बेहरेमराठी अभिनेता