Join us  

महिला कलाकारांनी मासिक पाळीवेळी..? नाट्यगृहांमधील गैरसौयीवरुन निवेदिता सराफ भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:28 AM

नाट्यगृह बांधतानाच अनेक गोष्टींचा विचारच केला गेला नाही.

मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आजही नाटक, मालिकांमध्ये काम करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी तो काळ गाजवला होता. नंतर त्या खऱ्या आयुष्यात अशोक सराफ यांच्या पत्नीही झाल्या. नुकतंच त्यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर भाष्य केले.

नाट्यगृहांची दुरावस्था ही खरंतर नेहमीचीच तक्रार आहे. कलाकार आणि प्रेक्षक अशा दोघांना याचा सामना करावा लागतो. 'मित्रम्हणे' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या,"नाट्यगृहांची परिस्थिती तशीच आहे आधीही तशीच होती. तेव्हाही कचऱ्याचे डबे नसायचे आताही नाहीयेत. लेडीज रुमच्या आत टॉयलेट नाहीएत. नाट्यगृह बांधतानाच महिला कलाकार ज्यांची मासिक पाळी असेल किंवा मेनोपॉजमधून जात असतील अशा कोणताही विचार केला गेला नाही."

त्या पुढे म्हणाल्या,"जर एखाद्या व्हिलचेअरवरील व्यक्तीला नाटक बघायचं असेल तर किती नाट्यगृहांमध्ये ती सोय आहे? नाहीच विचार केला गेला. जे लोक दुरुन येतात त्यांचं काय? आम्ही दुसऱ्या शहरातून जेव्हा येतो तेव्हा आम्हालाही अनेक तात्कळत राहावं लागलं आहे. का तर नाट्यगृहात शासकीय कार्यक्रम सुरु आहे.आजची नाट्यगृह एखाद्या प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची गरज आहे."

निवेदिता सराफ सध्या 'भाग्य तू दिले मला' या मालिकेत दिसत आहेत. शिवाय त्या 'मी स्वरा आणि ते दोघे' या नाटकातही काम करत आहेत.

टॅग्स :निवेदिता सराफमराठी अभिनेतानाटक