Join us  

Santosh Juvekar : ‘कळू दे ना मग सगळ्यांना हा चिकना माल ह्या कंपनीचा आहे...’, संतोष जुवेकरची लयभारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:39 AM

Santosh Juvekar : संतोष सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या त्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

झेंडा, प्रतिबिंब, शाळा, रेगे अशा कितीतरी चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar). संतोषने मालिकांपासून अभिनयाची केली आणि बघता बघता कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा संतोष आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. संतोष सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या त्याची फादर्स डे निमित्ताने शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.संतोषने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो वडिलांकडे पाहतोय. या फोटोला संतोषने दिलेली कॅप्शन फारच खास आहे.

‘चायला आज बाबांचा दिवस आणि विसरलो, त्यांनीच कॉल केला म्हणाले,अरे वेड...व्या आईला विश करतोस आणि मला विसरलास ? बाबा आय लव्ह यू सांगायची गरज आहेका??.. असं मी म्हटलं आणि ते म्हणाले, अरे माझ्या बाबाला मी नाही दाखवू शकलो जगाला.. पण तू दाखवू शकतोस ना तुझ्या बाबाला, कळू दे ना मग सगळ्यांना हा चिकना माल ह्या कंपनीचा आहे.... माझा बाबा लय माझ्यावर गेलाय... बाबूडी आय लव्ह यू रे!!, अशी कॅप्शन संतोष जुवेकरने या पोस्टला दिली आहे.

संतोषच्या या पोस्टचं सगळ्यांनीच भरभरून कौतुक केलं आहे. विशेषत: त्याने दिलेल्या कॅप्शनवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘कॅप्शनसाठी क्या बोलू खरच ग्रेट आहात तुम्ही संतोष सर,’ असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तुझ्या सारखा तूच दादा, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

संतोषने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.  या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार  या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत. 

टॅग्स :संतोष जुवेकरजागतिक पितृदिन