Join us  

 असं तयार झालं ‘मेरे देश की धरती’ हे सुपरहिट गाणं, वाचा एक थ्रोबॅक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 1:05 PM

‘उपकार’ सिनेमातील या लोकप्रिय गाण्याच्या निर्मितीमागचा किस्सा खुद्द मनोज कुमार यांनी सांगितला आहे

ठळक मुद्देमेरी देश की धरती हे गाणं आठवताना, मनोज कुमार गुलशन बावरा यांच्या आठवणीत रमले.

स्वातंत्र्यदिनी ‘मेरे देश की धरती’ (Mere Desh Ki Dharti ) हे गाणं आठवणार नाही, हे शक्यचं नाही. तूर्तास या गाण्याचा एक थ्रोबॅक किस्सा आम्ही सांगणार आहोत.‘उपकार’ (Upkar ) सिनेमातील या लोकप्रिय गाण्याच्या निर्मितीमागचा किस्सा खुद्द मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी सांगितला आहे. मंदिरातून परतताना हे गाणं मनोज कुमार यांनी ऐकलं आणि या गाण्याच्या जणू प्रेमात पडले...

मनोज कुमार सांगतात, ‘गीतकार गुलशन बावरा आणि मी मंदिरात गेलो होतो. पूजा आटोपून आम्ही घरी जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना गुलशन मेरे देश की धरती हे गाणं गुणगुणत होता. 2-3 वर्षांनंतर मी ‘उपकार’ हा सिनेमा बनवला आणि संगीतकार कल्याणजीजवळ गेलो. त्यांना स्क्रिप्ट ऐकवली. पण गुलशनचं ते गाणं माझ्या कानात जणू रूंजी घालतं होतं. मी त्याला घरी बोलवलं. माझ्या सिनेमासाठी मला तेच गाणं हवं होतं. ते गाणं सिनेमात घेतलं गेलं आणि अमर झालं...’गुलशन यांनी ‘उपकार’ साठी आणखी एक गाणं लिहिलं होतं.‘हर खुशी हो वहां’ हेच ते गाणं. अर्थात हे गाणं त्यांनी पूर्ण लिहिलं नव्हतं.  या गाण्याचं दुसरं कडवं अजीज कैफी आणि मनोज कुमार यांनी लिहिलं होतं.

गाण्याच्या प्रत्येक शब्दांत गुलशन जिवंत आहे...मेरी देश की धरती हे गाणं आठवताना, मनोज कुमार गुलशन बावरा यांच्या आठवणीत रमले. मेरी देश की धरती या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत गुलशन जिवंत आहे. हे गाणं गाणारे गायक महेंद्र कपूर यांचं निधन झालं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या गाण्याचा आवर्जुन उल्लेख केला होता. आज या गाण्याशी जुळलेले कल्याणजी, महेंद्र कपूर व गुलशन बावरा आपल्यात नाही. ते आज आपल्यासोबत नाही, याचं दु:ख  आहेच, असे मनोज कुमार म्हणाल़े.

टॅग्स :मनोज कुमार