Join us  

'मंगलम दंगलम' या मालिकेमुळे मनोज जोशी यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:38 PM

'मंगलम दंगलम' या मालिकेत मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी आजवर मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

सोनी सबवर लवकरच 'मंगलम दंगलम' ही मालिका दाखल होणार आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका अभिनेता करणवीर शर्मा साकारत आहे तर या मालिकेत करणवीरसोबत अभिनेता मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी आजवर मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

मनोज जोशी 'मंगलम दंगलम' या मालिकेत साडी उद्योजक संजीव सकलेचाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही मालिका संजीव सकलेचा आणि त्‍याचा जावई यांच्‍यामधील आगळ्यावेगळ्या नात्‍याला प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. संजीव त्‍याच्‍या मुलीचा विवाह न होता ती घरातच राहण्‍याची सर्वोत्तपरी काळजी घेत असतो. पण त्याची मुलगी रुमीसोबत (मनिषा रावत) विवाह करण्यास होकार मिळावा यासाठी त्‍याचा भावी जावई कोणतीच कसर सोडत नाही अशी 'मंगलम दंगलम' या मालिकेची कथा आहे. वास्‍तविक जीवनातील सासरच्‍या माणसांसोबत अशाप्रकारे काही गोष्‍टी घडल्या होत्या का असे विचारले असता मनोज जोशी यांनी आनंदाने त्यांच्या आयुष्यातील एक आठवण सांगितली. ते सांगतात, ''माझ्या सासऱ्यांच्या मोठ्या भावाने माझ्या विवाहाच्‍या वेळी मला पगाराबाबत विचारले. मी तेव्‍हा एक डिझाइनर होतो आणि नाटकांमध्‍ये काम करायचो. मी प्रामाणिकपणे त्‍यांना सांगितले की, मला अभिनेता व्‍हायचे आहे आणि माझे जीवन स्थिर नाही. माझा हा विश्‍वास पाहून ते प्रभावित झाले. मी त्‍यांना विश्‍वास दिला की, मी त्‍यांच्‍या मुलीचा कधीच अनादर करणार नाही आणि नेहमी तिला आनंदी ठेवेन. 

मजेशीर बाब म्‍हणजे मनोज जोशी 'मंगलम दंगलम' मालिकेत साकारत असलेली संजीव सकलेचा ही भूमिका मुलीच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असलेल्या पित्याची आहे. संजीव सकलेचा हा महत्‍त्‍वाकांक्षी व्यक्ती असून सकलेचा कुटुंबाचा आधारस्‍तंभ असल्याचे दाखवण्यात आले आहे.

'मंगलम दंगलम'  ही एक कॉमेडी मालिका असून या मालिकेत शुभा खोटे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही मालिका १३ नोव्‍हेंबरपासून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :मंगलम दंगलममनोज जोशी