Join us

मकरंद व सयाजीचा पुन्हा ‘गोंधळ’!

By admin | Updated: May 15, 2015 22:25 IST

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात सावळागोंधळ घालणारी मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा जमली आहे

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात सावळागोंधळ घालणारी मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा जमली आहे. ‘वॉंन्टेड बायको नं. १’ या चित्रपटात हे दोघे पुन्हा गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. पण ‘गल्लीत गोंधळ’सारखी राजकीय पार्श्वभूमी या चित्रपटाला नसून, कौटुंबिक गोंधळाची विनोदी किनार या चित्रपटाला आहे. त्यामुळे या दोघांच्या धिंगाण्याला ऊत येण्याची शक्यताच अधिक आहे.