'देव डी', 'साहेब बीवी और गुलाम' आणि 'नॉट ए लव स्टोरी' यांसारख्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री माही गिल हिला बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाले. तरीदेखील ती करियरच्याबाबतीच समाधानी नसून तिला एका गोष्टीची खंत देखील वाटते. ती सांगते की,'मला अशाच भूमिका मिळातात, ज्यामुळे मी एकाच प्रकारच्या भूमिका करत असल्याचा शिक्का लावण्यात आला आहे.'
माही गिलने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'मला अशा भूमिकांसाठी विचारलं जाते ज्यात सेक्सी किंवा बार गर्लची भूमिका असते. यासोबत जेव्हा कॉलगर्ल किंवा हातात दारूचा ग्लास असणाऱ्या महिलेची भूमिका करायचा असेव तर माही गिलची आठवण काढली जाते.' ती पुढे म्हणाली की, 'मला साहेब, बीवी और गँगस्टर चित्रपटासारख्या भूमिकांसाठी विचारले जाते. मात्र आता मला काहीतरी नवीन करायचं आहे.'
यावेळी तिने तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कसा मिळाला, याबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एका बर्थडे पार्टीमुळे तिला पहिला सिनेमा मिळाला. त्या बर्थडे पार्टीत ती चार तास डान्स परफॉर्म करत होती. त्या पार्टीत अनुराग कश्यप होते. त्यांनी मला नोटीस केलं आणि त्यानंतर त्यांनी मला 'देव डी' चित्रपटासाठी विचारलं.