Join us  

लोकमतच्या चिल्लर पार्टीत सलमान

By admin | Published: July 08, 2015 12:00 AM

तुमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता असा प्रश्न एका मुलाने विचारला. त्याच्या उत्तरात त्याने फुटबॉलपासून ते कबड्डीपर्यंत व टेनिसपासून विटी-दांडूपर्यंत ...

तुमचा सगळ्यात आवडता खेळ कोणता असा प्रश्न एका मुलाने विचारला. त्याच्या उत्तरात त्याने फुटबॉलपासून ते कबड्डीपर्यंत व टेनिसपासून विटी-दांडूपर्यंत सगळ्या खेळांचा उल्लेख करून मी थोडे थोडे सगळे खेळ खेळलो आहे असे सलमानने सांगितले.

आवडता प्राणी कोणता? असा प्रश्न एका मुलाने विचारल्यावर सलमानने मलाही तुमच्यासारखे सगळेच प्राणी आवडतात. विशेषत: कुत्रे आणि घोडे; शिवाय तुम्हाला आवडणारे ससे किंवा पक्षीही मला भावतात. पण कुत्र्यांवर माझा जास्त जीव आहे.

बेस्ट फ्रेण्ड कोण? असं विचारल्यावर सोहेल खान अरबाज खान सलिम खान अर्पिता असे खूप आहेत. ...आणि शाहरूख खान? असं विचारल्यावर (मनमुराद हसत) आधी नव्हता. पण नंतर झाला आणि आता आहे. बेस्टेस्ट नसला तरी चांगला फ्रेण्ड आहे; शिवाय आमिर खान आहे.

शाळेत असताना अभ्यासावरून ओरडा मिळायचा का? आमच्या वेळी ओरड्याची नव्हे मार देण्याची पद्धत होती. भरपूर पिटाई व्हायची... आईकडून जास्त पिटाई व्हायची की वडिलांकडून व्हायची?... आईकडून जास्त मार पडायचा; पण वडिलांचा मार जास्त लागायचा.

तुमच्या मते सुपर हीरो कोण बनू शकते? असे एका मुलाने विचारल्यावर सलमान म्हणाला की त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व त्याआधी आपले शिक्षण पूर्ण करावे लागते; त्यानंतर तर कोणीही सुपर हीरो होऊ शकतो.

एका मुलाने विचारलेल्या प्रश्नावर सलमानने ‘बजरंगी भाईजान’मधील भूमिकेची माहिती दिली.

मुलांच्या पुढ्यातल्या खुर्चीत बसायच्या आधीच त्याने प्रश्न फेकला... कार्ड आणलंय का? प्रेस कार्ड विचारतोय... तुम्ही प्रश्न विचारायला जमला आहात... प्रेसवाले बनून! त्यानंतर सवाल-जबाबाचा सिलसिला रंगतच गेला.

विशाल हृदय असलेल्या सलमान खान याच्या मनात मुलांसाठी खास स्थान आहे. सलमान भलेही बॉलिवूडचा फार मोठा स्टार असला तरी तो जेव्हा मुलांमध्ये येतो तेव्हा तो त्यांच्यापैकीच एक बनून जातो हे विशेष.

बजरंगी भाईजान ईदच्या मुहूर्तावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचा मीडिया पार्टनर असलेल्या लोकमत समूहाने मुंबई परिसरातील बच्चेकंपनीसोबतच्या संवादाची चिल्लर पार्टी सलमान भाईजानसाठी आयोजित केली होती. या कार्यक्रमाची ही चित्रमय झलक...