Join us  

लता मंगेशकर ' सो कॉल्ड प्ले-बॅक सिंगर' - न्यू यॉर्क टाइम्स

By admin | Published: June 01, 2016 1:51 PM

न्यू यॉर्क टाइम्स या अमेरिकेतील वृत्तपत्राने लता मंगेशकर यांचा उल्लेख ' सो-कॉल्ड प्लेबॅक सिंगर' असा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०१ - एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे वातावरण अद्याप तापलेले आहे. हा वाद शमलेला नसतानाचा अमेरिकेतील 'न्यू यॉर्क टाइम्स' या आघाडीच्या वृत्तपत्राने लता मंगेशकर यांचा ' सो कॉल्ड प्ले-बॅक सिंगर ' (तथाकथित गायिका) असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. 
 
( कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नाही - लता मंगेशकर)
 
( तन्मय भटला अटक होण्याची शक्यता?)
 
 
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत हा व्हिडीओ बनविण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर टीका करत हा व्हिडीओ वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला होता. त्यावरून देशभरात संतापाची लाट निर्माण झाली असून बॉलिवूडसह राजकीय पक्षांनीही तन्यवर टीकेची झोड उठवत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र खुद्द सचिन तेंडुलकर व लतादीदींना या विषयावर कोणतेच भाष्य न करता तन्मयला अनुल्लेखाने मारले. 
( तन्मय भटविरुद्धच्या कारवाईवरून पोलिसांसमोर पेच)
( एआयबीच्या तन्मयची सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर वादग्रस्त टीका)
 
 
मात्र भारतातसह जगभरात दीदी व सचिनेचे लाखो चाहते असून जगभरात या विषयावर चर्चा होत आहे. त्याचमुळे  अमेरिकेतील 'न्यू यॉर्क टाइम्स' वृत्तपत्रानेही या वादाची दखल घेत बातमी केली. मात्र त्या बातमीत या वृत्तपत्राने लता मंगेशकर यांचा '१९४०च्या दशकात गायनाला सुरूवात करणा-या सो-कॉल्ड सिंगर' असा उल्लेख केला असून त्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले आहे. लता मंगेशकर यांच्यावरील या टिप्पणीमुळे त्यांचे जगभरातील चाहते दुखावले गेले असून 'न्यू यॉर्क टाइम्स'वर टीकेचा भडिमार होत आहे. 
दरम्यान सचिन व लता दीदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तन्मय भटचा तो वादग्रस्त व्हिडिओ अन्य साईटवरून हटविण्यासाठी पोलिस आटापिटा करीत आहेत. फेसबूक व स्नॅपचॅटवरून हा व्हिडिओ हटवलाही गेला आहे. मात्र अनेक वेबसाईटवर या व्हिडिओच्या ज्या कॉपीज असून, त्या हटविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.