Join us  

"आजपर्यंत या आधीच्या माझ्या.." कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील मृण्मयीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 6:49 PM

कुन्या राजाची गं तू रानी मालिकेत मृण्मयीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे.

कुन्या राजाची गं तू रानी मालिका ही मालिका १८ जुलैपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत मृण्मयीची भूमिका अभिनेत्री पूर्णिमा डे साकारते आहे. कबीरवर निस्स्मीम प्रेम करणारी मृण्मयी मराठीची प्रोफेसर असते. नखशिखांत सुंदर आणि श्रीमंतीत वाढलेली. कुणावरही पटकन विश्वास न टाकणारी, पण एखाद्यावर विश्वास जडला की अखेरपर्यंत निभावणारी अशी ही मृण्मयी. यादरम्यान तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

पूर्णिमाने सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. पूर्णिमाने कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील सेटवरचा एका फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासोबत अभिनेता हर्षद अतकरी आणि शर्वरी जोगदेखील दिसताेत. 

हा फोटो शेअर करताना पूर्णिमाने लिहिले, आजपर्यंत या आधीच्या माझ्या सर्व पात्रांवर भरभरून प्रेम केलत तसंच मृण्मयी वर सुद्धा कराल याची पूर्ण खात्री आहे. असं कॅप्शन दिलं आहे. पूर्णिमाच्या या पोस्टवर चाहत्यांनी नक्की नक्की बघणार, अप्रतिम अभिनय...मृण्मयी, शुभेच्छा  अशा कमेंट्स केल्या आहेत. 

आपल्या व्यक्तिरेखाबाबत बोलताना पूर्णिमा आधी म्हणाली होती की,, मी खूप दिवस ज्या भूमिकेच्या शोधात होते ती भूमिका मला मृण्मयीच्या रुपात भेटली. मनाने हळवी मात्र मनस्वी असं हे पात्र आहे. या पात्राला खूप शेड्स आहेत. तिच्या सधन असण्याचा तिला अजिबात अहंकार नाही. मात्र कबीर ने तिच्यापासून कधी काही लपवू नये इतकीच तिची भाबडी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृण्मयी दुष्ट नाही. नावाप्रमाणेच ती मृदू स्वभावाची आहे. मराठीची प्रोफेसर असल्यामुळे समजून घेणं आणि समजावून सांगणं तिला उत्तम जमतं.  

टॅग्स :कलर्स मराठी