Join us  

"ही सर्व नाटकं असून.."; गॅलेक्सी बाहेर झालेल्या गोळीबाराला ढोंग म्हणत KRK ने सलमानवर साधला निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:24 AM

कमाल आर खानने सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर वादग्रस्त वक्तव्य केलंय. काय म्हणाला KRK बघा (salman khan)

काल एका बातमीने सगळीकडे खळबळ उडाली. ती म्हणजे सलमान खान राहत असलेल्या बांद्राच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला. त्यामुळे काल सर्वांना धक्का बसला. अनेक राजकीय व्यक्ती आणि खान कुटुंबाचे हितचिंतक काल सलीम खान आणि कुटुंबाला भेटायला आलेले होते. अशातच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेला KRK अर्थात कमाल आर. खानने या सर्व प्रकाराला सलमान खाननेच रचलेलं एक नाटक म्हटलंय. काय म्हणाला KRK बघा.

KRK ने ट्विट करुन लिहिलंय की, "हा सर्व सलमान खाननेच रचलेला ड्रामा आहे. सल्लू भारतातील सर्वात मोठा गँगस्टर असून बाकी सर्व गँगस्टर त्याच्यासाठी काम करतात. जेव्हा सर्व लोकं पहाटे ५ वाजता झोपले होते तेव्हाच सल्लूने हवेत गोळीबार का केला. लोकप्रियता आणि सहानुभुती मिळवण्यासाठी सलमानने या सगळ्या प्रकाराची सोय केली होती. कारण त्याला माहितीय की त्याने सुशांत सिंग राजपूतसोबत काय केलंय याचा मी लवकरच खुलासा करणार आहे."

KRK ने पुढे सलीन खान यांना उद्देशून ट्विट केलंय की, "सलीम खान इमानदार आहेत. त्यामुळं हा सर्व पब्लिसिटी स्टंट आहे असं ते खरं म्हणाले." KRK ने केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. अनेकांनी KRK ला सुनावलं आहे. दरम्यान सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. पोलीस गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :सलमान खानसलीम खान