Join us  

'या' कारणामुळे तडकाफडकी मिनाक्षी शेषाद्रीने सोडला होता देश,अजूनही परतली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 4:49 PM

ऋषि कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, गोविंदा, राज बब्बर, राजीव कपूर, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्नासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती.

'हीरो', 'मेरी जंग', 'शहेनशाह', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली मीनाक्षी शेषाद्रीने नुकतीच वयाची  58 वर्ष पूर्ण केली आहेत. या वयातही ती कमालीची सुंदर दिसते. मीनाक्षी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर जात संसारात रमली आहे. घातक या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यानंतरही तिला अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण एका व्यक्तीच्या भीतीमुळे तिने  सगळ्या ऑफर्स नाकारल्या. रातोरात सगळं काही सोडून परदेशी रवाना झाली. त्यानंतर ती कधीच भारतात परतली नाही. 

मीनाक्षी गेल्या २५ वर्षापासून बॉलिवूडपासून दूर आहे. एका दिग्दर्शकाच्या लव्हप्रपोजचा तिने धसका घेतला होता. हे दिग्दर्शक दुसरे तिसरे कोणी नसून ते होते राजकुमार संतोषी. राजकुमार यांच्याच लव्हप्रपोजला घाबरुन तिने तडकाफडकी बॉलिवूडच नाही तर देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. मीनाक्षी अमेरिकेत डान्स क्लासेस चालवते. काही कार्यक्रमांमध्ये तिने परफॉर्मही केले आहे. राजकुमार संतोषी यांच्या लव्हप्रपोजनंतर मीनाक्षीने लग्न केले आणि लग्नानतर परदेशात स्थायिक झाली. मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या करियरमध्ये बड्या कलाकारांसोबत काम केले होते.

 

ऋषि कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, गोविंदा, राज बब्बर, राजीव कपूर, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्नासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती. अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. एकेकाळी आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ती गणली जात होती. आज मात्र इंडस्ट्रीपासून दूर राहून खासगी आयुष्य जगतेय. फार कमी लोकांना तिच्या खासगी आयुष्याविषयी माहिती आहे. 

आजही मीनाक्षीचे चाहते तिला मिस करत असतात. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. काळानुसार तिच्या लुक्समध्येही फरक पडला असला तरी चाहते आजही पूर्वीइतकेच तिच्यावर प्रेम करतात. 

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री