Join us

या अभिनेत्रीने 14 व्या वर्षी केले होते किस

By admin | Updated: February 22, 2017 20:56 IST

आयुष्यात काही लोकांना किस केल्याचा तिला आज पश्चातापही होत असल्याचेदेखील तिने कबूल केले. ती शाळेत असताना अतिशय साधी असल्याने तिच्या या गोष्टीचा अनेकांनी फायदा देखील घेतला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - एक सौंदर्यवती, जिच्या सौंदर्यावर सारेच फिदा. तिची प्रत्येक अदा असते तितकीच खास. ती म्हणजे श्रीलंकन ब्यूटीक्वीन आणि बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. तिने अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी नुकत्याच एका शोमध्ये शेअर केल्या. यावेळी आयुष्यातील पहिले किस आपल्या प्रियकरासोबत वयाच्या 14व्या वर्षी केल्याचे सांगितले. त्या प्रियकरासोबत ती प्रेमात आकंठ बुडाली त्यांचे हे नाते तीन वर्षं टिकले होते असेही ती म्हणाली. युट्युबवर हॅनी चव्हाणने घेतलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. यावेळी ती खुल्लम खुल्ला बोलतं होती. आपला बॉलिवूड प्रवास आणि त्यापुर्वीच्या आयुष्यात झालेल्या घटनांवर तिने प्रकाश टाकला. पुढे बोलतना ती म्हणाली, आयुष्यात काही लोकांना किस केल्याचा तिला आज पश्चातापही होत असल्याचेदेखील तिने कबूल केले. ती शाळेत असताना अतिशय साधी असल्याने तिच्या या गोष्टीचा अनेकांनी फायदा देखील घेतला असल्याची कबुली दिली. जॅकलिन आज भारतात राहात असली तरी ती मुळची श्रीलंकेची आहे. तिने मिस युनिव्हर्स श्रीलंका हा किताब देखील जिंकला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती एक टिव्ही रिपोर्टर होती हे खूपच कमी जणांना माहीत आहे. प्रत्येकाने आयुष्यात नेहमी आनंदित राहिले पाहिजे असे ती मानते. ती लहानपणापासूनच खूप मस्तीखोर आणि बडबड करणारी आहे असे तिने मुलाखतीत सांगितले. जॅकलिनचे बालपण बहेरीन या अरब देशात गेले. ती शाळेत खूप ऑप्टिमेस्टिक आणि बडबडी असल्याने तिला शाळेतील मुले रेडिओ बेहरिन म्हणत असतं. असा खुलासा तीने यावेळी केला.