Join us  

केजरीवाल माकड असल्याचे सिद्ध - राम गोपाल वर्मा

By admin | Published: October 06, 2016 4:55 PM

'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे',

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्माने खिल्ली उडवली आहे. 'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे', अशी उपहासात्मक टीका वर्माने केली आहे. ट्विटरवर त्यांनी ही टीका केली आहे. तसंच 'केजरीवाल हनुमान आणि सुग्रीवच्या जातीपलीकडे जाऊन आता शरीफ-मुशर्रफ यांच्या जातीत पोहोचले आहेत, हे  त्यांनी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हावरुन सिद्ध झाले आहे', असे देखील ते म्हणाले आहेत.
 
आणखी बातम्या
 
तसंच 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सैन्यदलाने देशविरोधी असणा-या अरविंद केजरीवाल यांच्यावर देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे', असेही वर्माने म्हटले आहे. लष्कराने केलेल्या कारवाईवर शंका उपस्थित केल्याबद्दल राम गोपाल वर्माने ट्विटरच्या माध्यमातून उपहासात्मक टीका करत केजरीवाल यांना चांगलेच फटकारले आहे. अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राइकसाठी मोदींचे कौतुक करतानाच पाकिस्तानचा खोटारेपणा उघड करण्यासाठी कारवाईचे पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. यावरुन अरविंद केजरीवाल यांच्यावर देशभरातून टीका सुरू आहे.