बाजीराव मस्तानी या चित्रपटातील काशीबाईची भूमिका याआधी राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली होती. सध्या प्रियंका चोप्रा तिच्या मेरी कॉम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे, त्याचसोबत ती तिच्या आणखी एका भूमिकेच्या तयारीला लागली आहे. भन्साळींच्या बाजीराव मस्तानीमध्ये प्रियंका काशीबाईची भूमिका निभावणार आहे. या प्रोजेक्टसाठी पूर्वी करिना कपूर आणि राणी मुखर्जीला शॉर्टलिस्ट करण्यात आले होते; पण तसे होऊ शकले नाही.