Join us
Daily Top 2Weekly Top 5

या टीव्ही अभिनेत्री केला धक्कादायक खुलासा म्हणाली, "माझा जीवसुद्धा जाऊ शकत होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:46 IST

गेले काही महिने माझ्यासाठी खूप कठीण राहिले.

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीने नुकताच तिच्यासोबत झालेल्या एका अपघाताबाबत खुलासा केला. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार पूजा म्हणाली काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात माझा जीवसुद्धा जाऊ शकला असता.   

पाच महिन्यांपूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये 'नच बलिए'च्या सेटवर एक अपघात झाला होता. पूजा म्हणाली, ''मला आता वेदना नाहीत. पण मी छोट्या-मोठ्या हालचाली अजून नाही करु शकत. मी उजव्या हाताचा उपयोग अजून करू शकत नाही आहे. माझं हस्ताक्षर बदलले आहे. ज्यामुळे माझं चेक्स बाऊंस होतात. मी अनेक गोष्टी उचलू शकतं नाही कारण माझ्या हातात ताकद नाहीय.

मी हातात अजून नीट ब्रश सुद्धा पकडू शकत नाही शूटिंगवर जाणं तर फार दूर राहिले. गेले काही महिने माझ्यासाठी खूप कठीण राहिले.'' पुढे पूजा म्हणाली, ''मी स्वत:ला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले. मी इतक्या जोरात पडले होते की माझा जीवसुद्धा जाऊ शकतं होता मात्र मी यातून वाचले. माझा चेहऱ्यावर आणि डोक्याला कोणतीच दुखापत झाली नाही. ज्यावेळी तुमच्यासोबत एखादी वाईट घटना घडते तेव्हा तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे मोल तुम्हाला कळते. ''     

टॅग्स :पूजा बॅनर्जी