Join us  

करिश्मा कपूरच्या घटस्फोटीत पतीचा ट्रिपल विवाह

By admin | Published: April 14, 2017 3:36 PM

अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर तिस-यांदा विवाहाच्या बोहल्यावर चढला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 14 - अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर तिस-यांदा विवाहाच्या बोहल्यावर चढला आहे.  बॉलिवूडलाईफच्या वृत्तानुसार काल (दि.13) संजयने मॉडल प्र‍िया सचदेवसोबत लग्न केलं. गेल्या महिन्यापासून हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होती. गेल्या वर्षीच करिष्मा आणि संजय दोघं वेगळे झाले होते. 
 
संजय कपूरचं हे तिसरं लग्न आहे, करिश्मासोबत लग्न करण्याआधीही त्याचा एक घटस्फोट झाला होता. तर, दिल्लीच्या एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबाशी संबंध असलेल्या प्रियाचंही हे दुसरं लग्न आहे. प्रिया आणि संजयचं अफेअर 5 वर्षांपासून होतं अशी चर्चा आहे.  प्रिया सचदेवचं यापूर्वी न्यूयॉर्कस्थित उद्योगपती विक्रम चटवालसोबत लग्न झालं होतं. प्रिया आणि संजय 2013 पासून परस्परांच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते. 
 
या लग्नाबाबत चर्चा होऊ नये याची संजयच्या कुटुंबाकडून पूर्ण काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे या विवाहाचे जास्त फोटो अजून बाहेर आलेले नाहीत. करिश्मासोबत झालेल्या घटस्फोटानंतर संजयला पुन्हा प्रकाशझोतात यायची इच्छा नसल्याचं यामागे कारण सांगितलं जात आहे.  
 
संजय आणि करिश्माचे 2003 मध्ये लग्न झाले. त्यांनी 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. जुलै 2016 मध्ये बांद्रयातील कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. संजयपासून करिष्माला समायरा (11) आणि कियान राज (6) दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले करिष्माजवळ राहतात.