Join us

कपूर कुटुंबालाच विसरला शाहिद

By admin | Updated: July 16, 2015 05:11 IST

गत आठवड्यात दिल्लीत मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर मुंबईत होणाऱ्या स्वागत समारंभासाठी शाहिद कपूर कोणाला आमंत्रित करणार याची बॉलिवूडमध्ये

गत आठवड्यात दिल्लीत मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर मुंबईत होणाऱ्या स्वागत समारंभासाठी शाहिद कपूर कोणाला आमंत्रित करणार याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. लग्नानंतरच्या या स्वागत समारंभाला करिना कपूरला निमंत्रण असणार नाही, अशी सर्वांनाच खात्री होती. मात्र धक्का तेव्हा बसला जेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबियांना लग्नाच्या स्वागत समारंभापासून शाहिदने दूर ठेवले. शाहिदच्या स्वागत सोहळ्यासाठी कपूर परिवारातील कोणालाही निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्र रणबीर कपूरकडेही शाहिदने दुर्लक्ष केले. शाहिदने नेहमीच रणबीरचे कौतुक केले आहे. निमंत्रण यादीत रणबीर असेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. ऋषी कपूर सोहळ्यात जाण्यास तयार होते, मात्र नंतर त्यांनी आपली इच्छा बदलली.