सुपरस्टार सलमान खानचा रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी कॉमेडी नाईटस् विथ कपिलचा होस्ट कपिल शर्माने होकार दिला आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून या शोमध्ये तो एकटाच येणार नसून त्याचे कॉमेडी नाईटस्मधील कुटुंबही या शोमध्ये सहभागी होईल, अशी चर्चा आहे. ही बातमी खरी ठरली तर येणाऱ्या काळात या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी पाहायला मिळेल. कॉमेडी नाईटस्चे दोन सदस्य गुत्थी (सुनील ग्रोवर) आणि पलक (किकू शारदा) हे दोघेही दिवाळीत या शोमध्ये सहभागी झाले होते. नवीन वर्ष असल्याने यावेळी कॉमेडी नाईटस् विथ कपिलमधील सर्व कलाकार शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करतील.
कपिलची वाईल्ड कार्ड एन्ट्री
By admin | Updated: December 24, 2014 23:33 IST