Join us

कपिलला नर्गिसचा नकार

By admin | Updated: July 2, 2014 09:06 IST

नर्गिसला कपिलची हिरोईन बनण्यात रस नाही. कपिल जरी टीव्हीचा मोठा स्टार असला, तरी मोठ्या पडद्यावर अद्याप त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे नवोदित कलाकारासोबत काम करण्याची नर्गिसची इच्छा नाही.

कपिल शर्माच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाची घोषणा होऊन बराच काळ लोटला आहे; पण चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही. शूटिंगचे तर लांबच राहिले; पण चित्रपटाची हिरोईनही अद्याप फायनल झालेली नाही. यशराज फिल्म्सही अजूनही या चित्रपटासाठी हिरोईनच्या शोधात आहे. या चित्रपटाची आॅफर नर्गिस फाखरीला देण्यात आली होती; पण तिने कपिलसोबत काम करायला नकार दिल्याचे कळते. तारखांचे कारण सांगून नर्गिसने हा चित्रपट नाकारला. सूत्रांनुसार नर्गिसला कपिलची हिरोईन बनण्यात रस नाही. कपिल जरी टीव्हीचा मोठा स्टार असला, तरी मोठ्या पडद्यावर अद्याप त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे नवोदित कलाकारासोबत काम करण्याची नर्गिसची इच्छा नाही.