ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - बॉलिवूडचा दबंग सलमान खानमुळे कपिल शर्मा दिलासा मिळाला आहे. घसरत्या टीआरपीमुळे सोनी चॅनलने कपिल शर्माला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. कपिलचा शो बंद करुन त्या जागी सलमान खानच्या "दस का दम" या शोचं नवं सत्र सुरू होणार असल्याचं वृत्त होतं. पण सलमान खानकडे सध्या वेळ नसल्यामुळे कपिल शर्माला याचा फायदा झाला आहे. सलमान खान सध्य़ा टायगर जिंदा है या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार दस का दम हा शो जानेवारी 2018 मध्ये येणार आहे. सलमानकडे सध्या वेळ नाही. त्याचा आगामी चित्रपट ईदला रिलीज होत आहे. तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच टायगर जिंदा है याचे शुटींगही सुरु आहे. सलमानच्या व्यस्त कार्यक्रमामुळे कपिल शर्माला आपल्या शोचा टीआरपी वाढवण्याची संधी मिळाली आहे. जर कपिल शर्माने दोन महिन्यात शोची टीआरपी वाढवल्यास शो बंद होणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार चॅनलने कपिलला आणखी दोन महिन्याचे अल्टिमेटम दिले आहे.
सुनिलशी झालेला वाद आणि त्यानंतर आलेली आयपीएल स्पर्धा यामुळे कपिलच्या शोचा टीआरपी चागंलाच घसरला होता. पण आता आयपीएल संपले आहे. त्यामुळे कपिलला आपला टीआरपी सुधारण्यास मदत होईल. हाफ गर्लफ्रेंडच्या प्रमोशनसाठी आलेल्या अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर या एपिसोडला टीआरपी वाढला होता. प्रेषकांनी या भागाला चांगलीच पसंती दर्शवली होती. सलमान खान आणि सोनी चॅनल यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. लवकरच "दस का दम"चा तिसरा सिझन सुरू होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही 2008 आणि 2009 मध्ये सलमानने या रियालिटी शोचे दोन सिझन टेलिकास्ट झाले आहेत.
100 एपिसोड पूर्ण केलेल्या "द कपिल शर्मा शो"चा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे. मे महिन्यात कपिलचा चॅनलबरोबर करार संपत आहे. चॅनल पुन्हा करार करण्याच्या तयारीत नसल्याची माहिती मिळत आहे. नंबर एक आणि दोनवर असणारा हा शो सध्या टॉप 10 शोच्या यादीतूनही बाहेर फेकला गेला आहे. सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर आणि अली असगर ने कपिलचा शो सोडल्यापासून या शोचा टीआरपी घसरत चालला आहे. यापुर्वी जर कपिलने सुनील आणि अलीला परत आणले नाही तर त्याचा शो बंद करण्याचा इशारा चॅनलकडून कपिलला देण्यात आला होता व त्यांना परत आणण्यासाठी कपिलला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला होता अशा बातम्याही आल्या होत्या.