Join us

कपिल शर्माच्या टीममध्ये नवा भिडू

By admin | Updated: March 29, 2017 17:30 IST

कपिलशी झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी शो सोडल्याच्या चर्चेनंतर या शोमध्ये कोणाची एण्ट्री होणार याबाबत तर्कवितर्क काढले जात होते

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - कपिलशी झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी शो सोडल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या शोमध्ये कोणाची एण्ट्री होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या आठवड्यात विनोदवीर राजू श्रीवास्तव , सुनिल पाल आणि एहसान कुरेशी यांची 'द कपिल शर्मा' शोमध्ये एण्ट्री झाली होती. त्यांची ती एण्ट्री पाहुणे म्हणून आहे की, कायमस्वरुपी हे मात्र अद्याप समजले नाही. कपिलच्या शोमध्ये नव्या पात्राचा समावेश झाल्याची  अधिकृत माहिती सोनी टिव्हीने ट्विट करत दिली आहे. , 'कोई आ रहा है कपिलके मोहल्लेमें अपनी कलाकारी का धमाका करने!' असे टि्वट सोनी टीव्हीने केले आहे. त्यामुळे या आठवड्यात कपिलच्या 'मोहल्ल्या'मध्ये प्रेक्षकांना डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीऐवजी नवेच पाहुणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागच्या आठवडयात नवीन कलाकारांसह झालेल शुटिंग प्रेक्षकांना फारस आवडल नसल्याची चर्चा आहे. शोचे चाहते आपल्या लोकप्रिय डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीलाच मिस करु शकतात. 

 

काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चर्चेत आहे. कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा बिझनेस क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्माने सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केला होता. तेव्हापासून सुनील ग्रोव्हर शो सोडणार असल्याची चर्चा आहे.