Join us

कपिल शर्माची प्रेमाची कबूली, जाणून घ्या कोण आहे त्याची अर्धांगिनी

By admin | Updated: March 19, 2017 08:09 IST

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माने आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. लवकच तो तीच्या सोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माने आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. लवकच तो तीच्या सोबत लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवरील कॉमेडी नाईट विथ कपिल या अत्यंत प्रेक्षकप्रिय मालिकेने कपिल शर्मा घरोघर पोहोचला आहे. कपिलने काल ट्विटर याचा खुलासा केला आहे. गिन्नी चतार्थ हिच्याशी तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा साखरपुडाही झाल्याचे म्हटले जात आहे. पंजाबमधिल जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. या दोघांनीही स्टॅण्ड अप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली होती.आपल्या शो मध्ये कपिल अनेक अभिनेत्रीना फ्लर्ट करत असल्याचे तुम्ही पाहता, विशेषता दीपिका पादुकोन त्याची आवडती अभिनेत्री. पण कपिलने केलेल्या ट्विटवरुन हे सिद्ध होते की त्याच्या आयुष्यात त्या एका मुलीची एन्ट्री झाली आहे. दोघंही एकमेकांसोबत फार खूश आहेत. कपिलने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शनिवारी कपिल शर्माने गिन्नी चतार्थच्या फोटोसह एक खास ट्विट केले. सुरुवातीच्या पहिल्या ट्विटमध्ये, मी पुढच्या 30 मिनिटात तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार असल्याचे, त्याने म्हटले. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये कपिलने त्याच्या प्रेयसीसोबतचा फोटो ट्विट करत लिहले की, ही माझी अर्धांगिनी आहे असे मी म्हणणार नाही. ती मला पूर्णत्व आणते. लव्ह यू गिन्नी, कृपया हिचे स्वागत करा.. मी तिच्यावर खूप प्रेम करतो.

 

कोण आहे गिन्नी चतार्थ? कपिलने सोशल मीडियावर आपल्या प्रेयसी बद्दल ट्विट करत चाहत्यांना गोड धक्का दिल्यानंतर चाहत्यांमध्ये ही गिन्नी चतार्थ कोण आहे हा एकच प्रश्न पडला. गिन्नी आणि कपिल कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या या नात्याचे प्रेमात रुपांतरण होण्यास काही वेळ लागला नाही. आयुष्याच्या चढ-उतारामध्ये या दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. सध्या जलंधर येथे राहत असलेली गिन्नी लग्नानंतर के९ या कपिलच्या निर्मिती संस्थेची धुरा सांभाळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गिन्नी आणि कपिल ह्यहस बलियेह्ण कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. कपिलची सहकलाकार असलेली सुमोना चक्रवर्ती आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रिती सिमोज यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते.