यशराज बॅनरचा ‘बँकचोर’सारखा चित्रपट कपिल शर्माने हातातून का जाऊ दिला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणे साहजिकच आहे; पण चाहत्यांच्या याच प्रेमापोटी कपिलने हा चित्रपट सोडल्याचे त्याचे म्हणणे आहे. ‘चित्रपट की कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ हा शो या द्विधेत सापडलेल्या कपिलने अखेर कॉमेडी नाईटस्ची कास धरली. सूत्रांनुसार कपिल या चित्रपटात एकाच अटीवर काम करू शकणार होता,ते म्हणजे या शोचे प्रसारण आठवड्यातून दोन दिवसांऐवजी एक दिवस असे करावे; पण शोच्या निर्मात्यांना हे मान्य नव्हते. त्याशिवाय कपिलचा हा शो एकच दिवस प्रसारित होणार असेल, तर चॅनेलने आणखी एक कॉमेडी शो सुरू करण्याचा निर्णय कपिलला सांगितला होता. कपिलला हेही मान्य नव्हते. शेवटी कॉमेडी नाईटस्ला प्राथमिकता देत त्याने चित्रपट नाकारला.
‘कॉमेडी नाईटस्’साठी कपिलने सोडला ‘बँकचोर’
By admin | Updated: July 10, 2014 00:31 IST