गेल्या काही वर्षात कंगनाने वेगळ्या भूमिका साकारून स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. ‘तनू वेड्स मनू रिटर्न’मध्येही ती अशीच वेगळी भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करीत आहेत. सिक्वलचे कथानक ‘तनू वेड्स मनू’ जेथे संपते, तेथून सुरू होणार आहे. या चित्रपटात ती एका हरयाणवी अॅथलीटच्या भूमिकेत दिसणार असून, तिने ट्रेनिंगही सुरू केले आहे. चित्रपटातील भूमिकेबाबत कंगनाने सांगितले की, चित्रपटात तिचे नाव कुसुम सांगवान आहे; पण सर्व जण तिला लाडाने डट्ट नावाने हाक मारत असतात. ती हरियाणातील झांझर जिल्ह्यातील रहिवासी असून दिल्ली विद्यापीठात शिकते. ती राज्यस्तरीय खेळाडू आहे. या चित्रपटासाठी तिने धावण्याची शर्यत, ट्रिपल जंप आणि लाँग जंपचे प्रशिक्षण घेतले आहे.
कंगना बनणार अॅथलीट
By admin | Updated: November 28, 2014 23:27 IST