ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १४ - प्रसिद्ध अभिनेता कमल हसन जिन्यावरून घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना चेन्नईच्या अपोलो रूग्नालयालयात दाखल करण्यात आलं आहे. लॅास अँडिलीसमध्ये सबाश नायडू या आगामी सिनेमाचं शुटींग पूर्ण करून ते नुकतेच त्यांच्या घरी परतले होते. मात्र बुधवारी ते घरी जिन्यावरून घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. ही दुखापत गंभीर नसली तरी त्यांना काही काळ पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या आगामी सिनेमाचं पुढचं शेड्युल हैदराबादलाच होणार असल्याचं माहिती मिळत आहे.