Join us  

जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:58 AM

विशेष गोष्ट म्हणजे खुद्द काजोलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

काजोल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री असलेली काजोल कायमच चर्चेत असते. काजोलचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही खळखळून हसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये विविध ठिकाणी काजोल ही धडपडताना दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे खुद्द काजोलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

जगभरात 5 मे 2024 रोजी 'जागतिक हास्य दिन' साजरा करण्यात आला. या खास दिवशी काजोलनेही आपल्या चाहत्यांना हसवलं. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काजोल सार्वजनिक ठिकाणी वारंवार पडताना दिसते. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या सर्व क्लिप पाहिल्यानंतर मला जाणवलं की मी फोटो क्लिक करताना आश्चर्यकारकपणे चांगले वागते. तेव्हा चील करा आणि हा व्हिडीओ पहा'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट आणि लाईक्स केल्या आहेत. 

काजोलच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावर कमेंट करत डिझायनर मनीष मल्होत्रानं लिहिलं, 'मला आठवते की मॉरिशसमध्ये तु कशी पडली होती आणि आम्हाला धावत तुझ्याकडे यावं लागलं होतं. पण, नंतर आम्ही आपण खूप हसलो होतो. तसेच 'कुछ कुछ होता है'च्या अनेक आठवणी आहेत. तुझ्यावर खूप प्रेम आहे'.  तर क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेता अभय देओल आणि वत्सल सेठनेही कमेंट केल्या आहेत. 

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्यावर्षी काजोलने ओटीटी क्षेत्रात पदार्पण केलं. 'लस्ट स्टोरीज २' या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने ओटीटी माध्यमांत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये ती पाहायला मिळाली. देशभरातील लाखो चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :काजोलसेलिब्रिटीसोशल व्हायरलअजय देवगण