‘सनम रे’ को-स्टार पुल्कित सम्राट आणि यामी गौतम हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या डेटिंगमुळे नव्हे तर त्यांच्या आगामी चित्रपट ‘जुनूनियात’मुळे. चित्रपटाची रीलीज डेट नुकतीच जाहीर झाली असून तो २४ जून रोजी रीलीज होणार असल्याचे कळते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, निर्माता भूषण कुमार निर्मित चित्रपट काश्मीर आणि अमृतसर येथील दऱ्या आणि धबधब्यांमध्ये शूट करण्यात येत आहे. अजून ९ महिने चित्रपटाच्या रीलीजलाच लागतील. चित्रपटाचे संगीत हिट होणार असे बोलले जात आहे. अंकित तिवारी, मीत ब्रोज, जीत गांगुली हे संगीतबद्ध करणार आहेत. पुल्कित आणि यामी हे एकत्र सनम रेमध्ये दिसले होते.
‘जुनूनियात’ २४ जूनला
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST