अ भिनेत्री ज्ॉकलीन फर्नाडिस आता हॉलीवूड चित्रपटात दिसणार आहे. एका हॉलीवूड सस्पेंस थ्रिलरमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळते. दिग्दर्शक जेम्स सिम्पसन यांच्या डेफिनेशन ऑफ फिअर या चित्रपटात ज्ॉकलीन लीड रोलमध्ये दिसेल. सध्या ती रणबीर कपूर आणि अजरुन रामपाल यांच्यासोबत रॉय या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मलेशियाला गेली आहे. त्यानंतर या हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती कॅनडाला रवाना होणार आहे.