Join us

जॉन सेटवर धडपडला !

By admin | Updated: January 25, 2015 23:31 IST

रस्त्यावर सुस्साट ‘ड्राइव्ह’ करण्यात वेगळीच मजा असते. मात्र वाळूमध्ये ड्राइव्ह करताना थोडीशी काळजी घ्यायलाच हवी

रस्त्यावर सुस्साट ‘ड्राइव्ह’ करण्यात वेगळीच मजा असते. मात्र वाळूमध्ये ड्राइव्ह करताना थोडीशी काळजी घ्यायलाच हवी. मात्र वाळूमध्ये ड्राइव्ह करायची हीच मजा अभिनेता जॉन अब्राहमच्या अंगाशी आली आहे. आगामी ‘वेलकम बॅक’च्या दुबईमध्ये शूटिंगसाठी व्यस्त असलेला जॉन वाळूमध्ये ड्रायव्हिंगचा सीन शूट करीत असताना जखमी झालाय. त्यामुळे सेटवर लगेच डॉक्टरांनी धाव घेऊन उपचार सुरू केले़ सध्या जॉनची फिजिओथेरपी सुरू आहे. तो पूर्ण बरा झाला की मगच शूटिंग सुरू होईल.