Join us  

नोकरी गेली अन् परिणिती अभिनेत्री झाली

By admin | Published: September 01, 2014 4:30 AM

परिणिती चोपडा ही सर्वांत चर्चेतील अभिनेत्री आहे. चित्रपटात करिअरचे स्वप्नदेखील तिने कधी बघितले नव्हते; परंतु नोकरी गेल्यामुळे ती या क्षेत्रात आली.

परिणिती चोपडा ही सर्वांत चर्चेतील अभिनेत्री आहे. चित्रपटात करिअरचे स्वप्नदेखील तिने कधी बघितले नव्हते; परंतु नोकरी गेल्यामुळे ती या क्षेत्रात आली. ‘व्यवसायाने मी बँकर आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे माझे ध्येय होते. त्यासाठी लंडनला स्थायिक होण्याचा मानस होता. मी लंडनला गेले. नोकरीही स्वीकारली; परंतु जागतिक मंदीमुळे नोकरी गमवावी लागली. भारतात परतण्याशिवाय पर्यायच नव्हता. नोकरी गमावली नसती, तर मी चित्रपटात कधीच आले नसते’, असे परिणितीने सांगितले. ‘दावत- ए- इश्क’ हा परिणितीचा चौथा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ‘इश्कजादे’ या कारकीर्दीतील दुसऱ्याच चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.