‘होणार सून मी या घरची’ या मालिकेचे ‘अच्छे दिन’ पुन्हा परत आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. व्हॉटस अॅपवर ‘काहीही हां श्री’ या डायलॉगने धुमाकूळ घातला. टीव्हीपेक्षा जान्हवी आणि श्री व्हॉटस अॅपवरच जास्त हिट झाले. जान्हवी-श्रीमधील मतभेद, जान्हवीच्या आईच्या करामती, श्रीच्या सर्व आयांचा राग यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. पण, बाळ होणार असल्याची बातमी श्रीला समजली आणि या सोहळ्यापासून मालिका पुन्हा ट्रॅकवर आल्याचं दिसतंय. जान्हवीचे डोहाळे पुरवण्यासाठी आजीची आणि कांताकाकाची धडपड सर्वांनाच आवडतेय. सर्व आयांना जान्हवी आणि श्रीने बाळाच्या आगमनाची बातमी नुकतीच दिलीये. त्यामुळे घरातल्या सर्वांनाच कमालीचा आनंद झालाय. जान्हवीला कधी आइसक्रीम खायची इच्छा होतेय तर कधी पावसात भिजण्याची. आता मालिकेतला हा आनंद असाच टिकून राहणार, की पुढे काही टिवस्ट येणार, हे लवकरच कळेल!
जान्हवी-श्रीमधील मतभेद संपले
By admin | Updated: July 16, 2015 05:10 IST