Join us

जेनिफरला वाटायची मूल न होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 02:27 IST

जेनिफर लॉरेन्ससारखे यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असेल.

जेनिफर लॉरेन्ससारखे यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असेल. एवढी सुपर सक्सेसफुल असूनही तिला मात्र काही गोष्टींची भीती वाटते आणि त्या भीतीच्या मागचे कारणही फार बालिश आणि मजेशीर आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण फुं कणाऱ्या जेनिफरला ‘पॅसेंजर्स’सारख्या सायन्स-फिक्शन-अ‍ॅडव्हेंचर-अ‍ॅक्शन सिनेमात काम करणे सोपे नव्हते. कारण तिला स्टंट करताना घालावे लागणाऱ्या हार्नेसची फार भीती वाटते. तिला अशी भीती वाटते की, तिने जर हार्नेस घातले तर तिला कधीच मूलबाळ होणार नाही. आश्चर्य वाटले ना? नुकतेच तिने हे सांगितले की, ‘अ‍ॅक्शन सीन्स शूटिंग करताना घालावे लागणाऱ्या हार्नेसची मला प्रचंड भीती वाटते. ते घातल्याने माझी मुलांना जन्म देण्याची क्षमता कमी होऊन जाईल असा माझा समज बनला आहे. म्हणून तर क्रिस प्रॅटला अनेक स्टंट एकट्याला करावे लागले.’ येत्या ६ जानेवारी रोजी ‘पॅसेंजर्स’ ‘३-डी’मध्ये हिंदी, तमिळ, इंग्रजी आणि तेलुगू अशा चार भाषांमधून रिलीज होतोय.