Join us

‘जज्बा’ अ‍ॅक्शन चित्रपट नाही - ऐश

By admin | Updated: October 9, 2015 02:56 IST

अ भिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन तिचा आगामी चित्रपट ‘जज्बा’मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. परंतु, तिचे म्हणणे आहे की, हा चित्रपट अ‍ॅक्शन चित्रपट नाही. चित्रपटाच्या प्रमोशनल

अ भिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन तिचा आगामी चित्रपट ‘जज्बा’मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. परंतु, तिचे म्हणणे आहे की, हा चित्रपट अ‍ॅक्शन चित्रपट नाही. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ऐश्वर्या म्हणाली, ‘अ‍ॅक्शन हा चित्रपटाचा एक हिस्सा आहे. हा अ‍ॅक्शन चित्रपट नाही. यात ऐश एक वकील आणि आईच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यात बलात्कार आणि खुनाच्या एका आरोपीविरुद्ध केस लढावी लागते. जेव्हा ऐशला विचारण्यात आले की, तुम्ही या रोलसाठी स्वत:ला कसे तयार केले? तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्याजवळ तयारीसाठी वेळच नव्हता. माझी परिस्थिती अशी होती की सेटवर जा आणि शूटिंग करा. मला आनंद वाटतोय की मी हे करू शकले.’