Join us

जय मल्हार घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By admin | Updated: April 1, 2017 04:52 IST

जय मल्हार ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

जय मल्हार ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत जय मल्हार ही भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेला तर या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता प्रेक्षकांची ही आवडती मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचे कळतंय. या मालिकेचे कथानक, या मालिकेतील व्यक्तिरेखा सगळ्याच प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने सुरभी हांडे, ईशा केसकर यांना प्रसिद्धीझोतात आणले. या मालिकेतील कलाकार, कथानक यांसोबतच या मालिकेच्या शीर्षकगीताची चांगलीच चर्चा झाली. आज या मालिकेचे शीर्षकगीत अनेक जणांची कॉलर ट्यून बनली आहे. तसेच या मालिकेतील "बानूबया" या गीतालादेखील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. हे गाणे लग्नसमारंभ, कार्यक्रमात अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळते. पण आता ही मालिका तीन वर्षांनंतर संपणार असल्याचे बोलले जात आहे.