अभिनेत्री कंगना रनौट आणि इमरान खान लवकरच ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी करणार आहे. निखिलशी बरीच चर्चा केल्यानंतरच कंगना या लव्ह स्टोरीत काम करायला तयार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या ती ‘तनू वेडस् मनू’मध्ये बिझी आहे. ‘कट्टीबट्टी’ या चित्रपटातून कंगना इमरानची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या जोडीबाबत बॉलीवूडमध्ये संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ‘तनू वेडस् मनू’चे चित्रीकरण झाल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाईल.
इमरान-कंगनाचा ‘कट्टी बट्टी’
By admin | Updated: July 18, 2014 11:27 IST