Join us

रणबीरच्या मम्मीला इम्प्रेस करण्यासाठी...

By admin | Updated: July 15, 2014 13:43 IST

बॉलीवूडचे हॉटेस्ट लव्ह बर्डस् रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील जवळीक आता एवढी वाढली आहे की, प्रकरण त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले आहे.

बॉलीवूडचे हॉटेस्ट लव्ह बर्डस् रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील जवळीक आता एवढी वाढली आहे की, प्रकरण त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले आहे. आजवर फक्त रणबीरसोबत दिसणारी कॅट आता त्याच्या कुटुंबियांसोबत फिरताना दिसत आहे. नुकतेच कॅट रणबीरची आई नीतू सिंह यांना घेऊन दक्षिण मुंबईच्या एका शानदार हॉटेलमध्ये डिनरसाठी गेली होती. दोघींनी सोबत बराच वेळ घालवला, त्यानंतर थोड्या वेळाने रणबीर आणि अयान मुखर्जी तेथे आले. चौघांनीही एकत्र डिनर घेतले. त्यानंतर रणबीरने कॅट आणि नीतू सिंह यांना त्याच्या गाडीतून घरी सोडले. कॅटरिनाच्या या ट्रीटने रणबीरची आई इम्प्रेस झाली की नाही, ते सांगणे कठीण आहे.