Join us  

IMDbने जाहिर केली प्रसिद्ध वेब सीरिजची यादी, सेक्रेड गेम्सने सगळ्यांना टाकलं मागं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 6:49 PM

IMDb या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिजची यादी प्रसिद्ध केली आहे.

IMDb या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी प्रसिद्ध  केली आहे.

“आमच्या यादीमधील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन मालिका (सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर) ह्यांना पाच वर्षं पूर्ण झाले असताना भारतातील वेब सिरीजच्या छोट्या पण लक्षवेधी इतिहासासंदर्भात आढावा सांगताना आम्हाला आनंद होत आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी म्हटले. “स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या संख्येसह भारतातील वेब सिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. ह्या यादीसह आम्ही जगातील चाहत्यांना प्रसिद्ध भारतीय वेब् सिरीज बघण्यासाठी व शोधण्यासाठी मदत करत आहोत. चाहत्यांना सर्वोत्तम कंटेंट मिळण्यामध्ये पुढेही आम्ही मदत करत राहू."असंही त्यांनी सांगितलं.

शो चालवणारे आणि सेक्रेड गेम्सचे सह- दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी ह्यानी म्हटले, “IMDb युजर्सद्वारे सेक्रेड गेम्सला क्रमांक एकचे स्थान दिल्यात आल्याचे कळाल्यानंतर मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. ह्या शोवर प्रेम करणा-या सर्व विशेष चाहत्यांचे मनापासून आभार आणि नेहमीप्रमाणेच अविश्वसनीय सहकारी आणि क्र्यू ह्यांचेही मनापासून आभार व त्यांचेही अभिनंदन.”

IMDb च्या आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज*1.    सेक्रेड गेम्स2.    मिर्झापूर3.    स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी4.    द फॅमिली मॅन5.    अस्पिरंटस6.    क्रिमिनल जस्टीस7.    ब्रीद8.    कोटा फॅक्टरी9.    पंचायत10.    पाताल लोक11.    स्पेशल ओपीएस12.    असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड13.    कॉलेज रोमान्स14.    अपहरण15.    फ्लेम्स16.    धिंडोरा17.    फर्जी18.    आश्रम19.    इनसाईड एज20.    अनदेखी21.    आर्या22.    गुल्लक23.    टीव्हीएफ पिचर्स24.    रॉकेट बॉयज25.    देल्ही क्राईम26.    कँपस डायरीज27.    ब्रोकन बट ब्युटीफूल28.    जामतारा: सबका नंबर आएगा29.    ताज़ा खबर30.    अभय31.    हॉस्टेल डेझ32.    रंगबाज़33.    बंदीश बँडीटस34.    मेड इन हेव्हन35.    इममॅच्युअर36.    लिटल थिंग्ज37.    द नाईट मॅनेजर38.    कँडी39.    बिच्छू का खेल40.    दहन: राकन का रहस्य41.    जेएल5042.    राना नायडू43.    रे44.    सनफ्लॉवर45.    एनसीआर डेज46.    महारानी47.    मुंबई डायरीज 26/1148.    चाचा विधायक हैं हमारे49.    ये मेरी फॅमिली50.    अरण्यक

1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजच्या रँकिंगनुसार ही यादी IMDbनं तयार केली आहे.

फर्जी, ताज़ा खबर, द नाईट मॅनेजर, आणि राना नायडू या 2023 मध्ये रिलीज झालेल्या  चार वेब सीरिजची नावं या यादीमध्ये आहेत. या यादीतील टॉप 10 सीरिजपैकी सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, आणि क्रिमिनल जस्टीस या  तीन सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. 

टॅग्स :सॅक्रेड गेम्समिर्झापूर वेबसीरिज