Join us  

अजय देवगणच्या चित्रपटातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट, तिच्याजागी लागली या अभिनेत्रीची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 5:10 PM

Raid 2 : 'रेड २' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो समोर आला आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण(Ajay Devgan)चा 'रेड' (Raid Movie) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यातील अजय देवगणच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते. पहिल्या भागात अजय देवगणसोबत इलियाना डिक्रुझ मुख्य भूमिकेत होती. पहिला भाग हिट झाल्यानंतर आता अजय देवगण दुसरा भाग घेऊन येत आहे. मात्र या दुसऱ्या भागातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट झाला आहे. तिच्या जागी अभिनेत्री वाणी कपूरची वर्णी लागली आहे. तिच्यासोबत आणखी एका अभिनेत्याची एंट्री सिनेमात झाली आहे.

रेड २ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो समोर आला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत वाणी कपूर आणि रवी तेजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच एक फोटो समोर आला आहे, ज्यात रवी तेजा आणि वाणी कपूरने हातात क्लॅप पकडलेलं दिसत आहे.

वाणी कपूरने मुहूर्ताच्या दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले. पोस्ट शेअर करताना वाणीने लिहिले की, लवकरच आम्ही मोठ्या पडद्यावर छापा टाकणार आहोत. खूप आभारी आहे. रेड मुहूर्त शॉट. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये भेटू. वाणीच्या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, वाणी ऑल द बेस्ट. तर दुसऱ्याने लिहिले- सुपर. एकाने लिहिले- वाह. या वर्षाची सुरुवात छान झाली आहे. रेड २ची वाट पाहू शकत नाही.

'रेड २'चं या ठिकाणी होणार शूटिंग

रेड २चे शूटिंग मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार करत आहेत. राजकुमार गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल सांगायचे तर, छापे टाकणाऱ्या आयकर अधिकाऱ्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. ते वास्तव जीवनावर आधारित होते. हा छापा दोन रात्री आणि तीन दिवस चालला होता. 

टॅग्स :अजय देवगणइलियाना डीक्रूजवाणी कपूर