बॉलीवूडमध्ये म्हटले जाते की, मैत्री आणि शत्रुत्वाचे नाते काही कायम राहत नाही. बदलत्या काळानुसार मैत्री आणि नात्यांमध्येही बदल होऊ लागतो. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्यातही असेच झाले आहे. एकवेळ अशी होती की, त्यांना ‘कपल’ म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांच्या नात्यातील अंतर एवढे वाढले आहे की, त्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. मध्यंतरी बिपाशाला तर जॉनचे नाव ऐकले तरीही राग यायचा. जॉन कसाबसा त्याच्या करिअरला पुढे नेतो आहे; पण बिपाशाचे काय? तिच्या करिअरने तर मार्गच बदलला आहे. त्यामुळे आता बिपाशाला जॉनची आठवण आली आणि तिने तिच्या करिअरसाठी त्याच्यासोबत चित्रपट करण्यास होकार दिला आहे. मात्र, निर्मात्याने अजून जॉनला विचारले नाही. जॉन त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत काम करील का?
जॉनसोबत काम करायचेय
By admin | Updated: August 1, 2015 05:13 IST