Join us  

'...अजून माझा विश्वास बसत नाही',आईच्या निधनानंतर रेशम टिपणीसची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:09 PM

रेशम टिपणीस (Resham Tipnis)वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे.

हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम टिपणीस (Resham Tipnis)वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे. याबाबत खुद्द तिनेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

रेशम टिपणीसने इंस्टाग्रामवर आईसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आई, तुझा फोन मला परत कधीच नाही येणार. या गोष्टीवर विश्वास नाही बसत अजून माझा. तू मला स्ट्राँग बनवलं आणि मी नेहमीच स्ट्राँग राहीन, असे तुला वचन देते. लव्ह यू आणि तुझी खूप आठवण येणार मला. रेशम टिपणीसच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी श्रद्धांजली वाहत असून ते तिला काळजी घ्यायला सांगत आहेत.

हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं अभिनेत्री रेशम टिपणीसने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. रेशम टिपणीस 'बिग बॉस' मराठी रिएलिटी शोमुळे चर्चेत आली. या शोमधील तिचा बोल्ड, बिनधास्त व फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. शेवटची ती भाऊबळी चित्रपटात पाहायला मिळाली. 

टॅग्स :रेशम टिपणीस