ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - आशिकी ३ मध्ये ह्रतिक रोशन व दीपिका पदुकोण ही जोडी एकत्र दिसेल अशी चर्चा बॉलीवूडच्या वर्तुळात रंगत आहे. ह्रतिकची हिरॉइन म्हणून सोनम कपूरला घेण्याचा विचार आधी होता अशीही चर्चा होती. राहूल रॉय व अन्नू अगरवाल या नवोदीत जोडीच्या आशिकीने इतिहास घडवल्यानंतर आशिकी २ मध्ये श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर झळकले होते. मात्र, आशिकी ३ मध्ये नव्या चेह-यांना संधी न देता फेमस चेहरे घेण्याचं निर्मात्यांनी निश्चित केल्याचं वृत्त एका फिलमी मॅगेझिनने दिलं आहे.
याआधी हर्तिक व दीपिका यशराजच्या सिनेमात एकत्र झळकतील अशी चर्चा होती, पण ते काही कारणामुळे फिस्कटलं. आता आशिकी ३ च्या निमित्तानं प्रचंड फॅन फॉलोइंग असलेले दोघे एकत्र आले तर ती दोघांच्याही चाहत्यांसाठी पर्वणी असेल.
अर्थात, बॉलीवूडमध्ये जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत नक्की असं काही नसतं, त्यामुळे आशिकी ३ मध्ये ह्रतिक - दीपिका ही जोडी असेल का वेगळी जोडी असेल याची उत्कंठा काही काळ तरी राहणारच आहे.