Join us

हृतिक आणि शाहिदची टक्कर

By admin | Updated: August 18, 2014 22:54 IST

अभिनेता हृतिक रोशनचा बँग बँग आणि शाहिद कपूरचा हैदर हे चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहेत. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर दमदार आहेत.

अभिनेता हृतिक रोशनचा बँग बँग आणि शाहिद कपूरचा हैदर हे चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहेत. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर दमदार आहेत. हैदर या चित्रपटातील अभिनेता शाहिदने बँग बँगचे प्रोमो पाहिले आहेत, त्याच्या मते हैदर आणि बँग बँग दोन्ही वेगळ्या टेस्टचे चित्रपट आहेत. शाहिद म्हणाला, ‘मी बँग बँगचा ट्रेलर पाहिला आहे, मला ते खूप आवडले. मी हा चित्रपट पाहायला जाणार आहे. दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ शकतात. बँग बँग बिग बजेट मूव्ही आहे; पण हैदरवर जास्त पैसा लागलेला नाही. अशावेळी आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. हैदर एक गंभीर चित्रपट असून बँग बँग एंटरटेनमेंट मूव्ही आहे. ’ सिद्धार्थ राज आनंद यांचे दिग्दर्शन असलेला बँग बँग नाईट अँड डे या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात हृतिकसोबत कॅटरीना मुख्य भूमिकेत आहे.